मुंबई- अभिनेत्री सबा आझादसोबत एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाल्यानंतर हृतिक रोशन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यादरम्यान हृतिक-सबा एकमेकांचा हात धरून कारमध्ये बसून पापाराझीपासून बचावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच एकच खळबळ उडाली होती. सगळीकडे एकच चर्चा होती की हृतिकसोबत जेवायला गेलेली ही मुलगी कोण आहे आणि आठ वर्षांनंतर हृतिकला पुन्हा प्रेम मिळाले आहे का?. आता या डेटिंग अफवांवर सबा आझादची प्रतिक्रिया आली आहे.
हृतिक रोशनसोबत डेटिंगबद्दल कायम म्हणाली सबा...
जेव्हा ई-टाइम्सने सबाला हृतिकसोबतच्या अफवांवर चर्चा करण्यासाठी कॉल केला तेव्हा अभिनेत्रीने उत्तर न देता कॉल डिस्कनेक्ट केला. पण कॉल डिस्कनेक्ट करण्यापूर्वी सबा नक्कीच म्हणाली, 'सॉरी, मी सध्या काही कामात बिझी आहे, मी तुम्हाला नंतर फोन करेन'.
हृतिक आणि सबाचा रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. संपूर्ण बॉलिवूडमध्येही हृतिक-सबाबाबत कुजबुज सुरू आहे.
कोण आहे सबा आझाद?
सबा आझादचे खरे नाव सबा सिंग ग्रेवाल आहे. सबा आझाद वयाने हृतिक रोशनपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. 2011 मध्ये सबा 'मुझसे फ्रेंडशिप करोगे', 'दिल कबड्डी' आणि 'लेडीज रूम' या टीव्ही कार्यक्रमात दिसली होती. याशिवाय ती अनेक वेब सीरिजमध्येही दिसली आहे. मीडियानुसार, सबा दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा अभिनेता इमाद शाह याच्यासोबतही रिलेशनशिपमध्ये आहे. सबा एक अभिनेत्री असण्यासोबतच थिएटर आर्टिस्ट आणि संगीतकार आहे. सबाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर ती 'रॉकेट बॉईज' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा -मौनी रॉयचा सासरी गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ