शिर्डी - कोरोना महामारीमुळे अनेक छोटया मोठया कलावंतांवर उपासमारीची वेळ आले आहे. यातीलच तमाशा कलावंत देखली मोठ्या अडचणीत सापडले असल्याने यांच्या मद्दतीसाठी आता शिर्डीकर धावून आले आहेत. तमाशा कलावंत जगला पाहीजे म्हणून शिर्डीतील ग्रामस्थांनी १ लाख रूपयांची मद्दत रघुवीर खेड़कर यांच्याकडे सुपुर्त केली आहे.
शिर्डी साईबाबा हयात असताना स्वतः कलावंताची आदर करायचे व मानधन द्यायचे. हीच परंपरा आज शिर्डीकरानी कायम ठेवली असल्याच पाहायला मिळाले. गेल्या 75 वर्षापासून रघुवीर खेडकर यांचा तमाशा शिर्डीत श्रीरामनवमी यात्रा दरम्यान भरयाचा. मात्र गेल्या वर्षाभरापासून देशावर व राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असल्याने मागील वर्षी आणि या वर्षी शिर्डीतील यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र गेल्या 75 वर्षापासून शिर्डीकराना मनोरंजनाचा आनंद देणारे तमाशा कलावंतदेखील या कोरोनाचा संकटात सापडले असल्याने त्यांना एक मदत म्हणून शिर्डीकरानी तब्बल १ लाख रूपयांची मद्दत आज रघुवीर खेड़कर यांच्याकडे सुपुर्त केली आहे.