स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सांग तू आहेस का’ मध्ये स्वराज आणि कृतिकाच्या वेडिंग लूकची जोरात चर्चा सुरु झाली आहे. मालिकेत आता लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर काही दिवसांपूर्वीच मिताली मयेकरसोबत विवाहबंधनात अडकला. आता रिअल नंतर रिल लाईफमध्येही त्याचे दोनाचे चार हात होताना दिसणार आहे.
हेही वाचा -६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी
स्वराज आणि कृतिकाच्या लग्नातील मोठा ट्विस्ट
स्वराज आणि कृतिकाच्या लग्नात मोठा ट्विस्ट दडलेला आहे. डॉ. वैभवीला स्वराजपासून दूर ठेवण्यासाठी सुलू हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. लग्नात तर तिने वैभवीला जीवे मारण्याचा घाटच घातला आहे. वैभवीचा जीव वाचवण्यात स्वराज यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.लग्नातला हा ट्विस्ट उत्कंठावर्धक आहेच. पण स्वराज वैभवीच्या रॉयल लग्नासाठी त्यांचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. वेशभूषाकार संपदा महाडिकने हा खास लूक डिझाईन केला आहे.
krutika royal dressing style
हेही वाचा -प्रसिद्ध कथालेखक सागर सरहदी यांचे निधन
सिद्धार्थ साकारत असलेल्या स्वराज या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. पारंपरिक नऊवारी साडीतील कृतिका आणि डिझायनर शेरवानी परिधान केलेला स्वराजचा लूक लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावरच्या आजवरच्या लग्नसोहळ्यांमधला हा रॉयल आणि हटके लूक आहे. ‘सांग तू आहेस का’ मालिकेतलं पुढचं वळण मनोरंजनाची पर्वणी ठरेल यात शंका नाही.