प्रेक्षकांना मालिकांमधील नायक नायिका नेहमी त्यांच्या भूमिकांच्या पेहरावात दिसत असतात त्यामुळे ते खऱ्या रूपात कसे दिसतात याबद्दल त्यांना कुतूहल असते. सध्या समाज माध्यमांच्या वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा आवाका खूप मोठा आहे. तसेच बहुतेक सर्वच कलाकार सोशल मीडियावर आपल्या खाजगी आयुष्यातील घडामोडींबरोबरच त्यांच्या कामाबद्दलच्या गोष्टींची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेयर करीत असतात. अशीच माहिती शेयर केली आहे मणिराज पवार आणि शिवानी सोनार या कलाकारांनी आणि ‘राजा रानीची गं जोडी’ च्या टीमने.
आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत. पुन्हा एकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही. ‘राजा रानीची गं जोडी’ ही कलर्स मराठीवरील मालिका प्रेक्षकांना खूप आवडतेय. यातील रणजित आणि संजीवनी या जोडीला ते भरभरून प्रेम देताहेत. मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. तिच्या प्रयताणांमुळे रणजीत जेलमधून सुटून घरी परतणार आहे. मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे.