मुंबई - ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा गेल्या काही दिवसापासून बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकतोय. अलिकडेच त्याचा लखनौमध्ये त्याचा सत्कार पार पडला. त्यावेळी लाखो युवक त्याची एक झलक पाहण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचले होते. अशातच आता नीरज चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये मुली त्याच्या समोर नाचत आहेत.
खरंतर, भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एका एफएम वाहिनीला व्हर्च्युअल मुलाखत देत होता. या दरम्यान, एफएम चॅनेलमध्ये उपस्थित मुलींनी 'उडे जब-जब जुल्फें तेरी ....' या गाण्यावर त्याच्यासमोर नृत्य केले. नीरज अक्षरशः डान्स बघत होता. नंतर, जेव्हा त्याला विचारण्यात आले की खूप छेडले का? त्यावर लाजत तो, ''थँक यू म्हणाला.''
यापूर्वी गोल्डन बॉय नीरज चोप्राला एका मुलाखतीत लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते तेव्हा तो म्हणाला, ''सध्या माझे संपूर्ण लक्ष फक्त खेळांवर आहे.'' महिला चाहत्यांकडून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल नीरज म्हणाला, ''मला आनंद आहे की मला प्रत्येकाकडून इतके प्रेम मिळत आहे.''
गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आला होता प्रश्न