महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्त्रियांच्या अंतःकरणातला आक्रोश बाहेर आणणारा चित्रपट 'रिवणावायली' ‘८ एप्रिल’ला होणार प्रदर्शित! - नवीन मराठी चित्रपट

रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. समाज कितीही पुढारलेला असला तरी त्याची स्त्री प्रतीची भावना मात्र सारखीच आहे.

rivanavayali
rivanavayali

By

Published : Mar 20, 2022, 1:56 PM IST

मुंबई -जग कितीही पुढे गेलं असलं तरी स्त्रियांच्या समस्या अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. स्त्रीशक्ती बाबत बोलले जाते. परंतु त्यावर अंमल होताना दिसत नाही. आजच्या चित्रपटांतून अनेक स्त्रीप्रधान कथानकं मांडली जात आहेत. लवकरच ‘रिवणावायली’ हा चित्रपट सामाजिक रूढींची परिसीमा ओलांडणारा असून लवकरच तो प्रदर्शित होत आहे.

रिवणवायली म्हणजे काय
रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. समाज कितीही पुढारलेला असला तरी त्याची स्त्री प्रतीची भावना मात्र सारखीच आहे. पुरोगामी होत असताना आधुनिक जगतात वावरत असताना स्त्री ला तिच्या हक्कासाठी तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागत. असाच एक लढा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे 'रिवणावायली'.

बीटरस्वीट
‘बिटरस्वीट' या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिक विजेती अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी जटणाऱ्या ऐश्वर्या देसाई या बंडखोर मुलीची ही कथा आहे. जुन्या रूढी परंपरा आणि लग्नाच्या बेडीत स्त्रिया अडकून जातात, अनेकदा इच्छा असून सुद्धा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वागता येत नाही. आयुष्यभराचा सोबती असलेल्या जोडीदाराकडून होणारी मुस्कटदाबी ही स्त्रीच्या अंतःकरणातला आक्रोश बाहेर आणते. याचंच बंडखोर चित्रण या 'रिवणावायली' मध्ये चित्रित करण्यात आलं आहे.

दिनेश कदम यांचे दिग्दर्शन
निर्माता व दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया गुरव सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
हेही वाचा -बाहुबली' स्टार प्रभासचा अपघात; स्पेनमध्ये रुग्णालयात शस्त्रक्रिया, लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांची प्रार्थना

ABOUT THE AUTHOR

...view details