मुंबई -अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांच्या जोडीची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. लग्नाच्या वाढदिवशी रितेशने शेअर केलेला मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता पुन्हा एकदा त्याने एक व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना एक सल्ला दिला आहे.
रितेश आणि जेनेलियाचा खूपच क्यूट अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतो. यामध्ये जेनेलिया रितेशला 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे', असे म्हणते. तेव्हा रितेश म्हणतो की 'माझं मात्र, दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे'. यावर जेनेलिया पुन्हा त्याला 'काय बोललास', असा प्रश्न विचारते. आता आपण कात्रीत अडकलोय, असं लक्षात येताच रितेश लगेच हजरजबाबीने उत्तर देतो, की 'मी तुझ्या हास्यावर प्रेम करतो'.
हेही वाचा -'उन जख्मो को क्यो छेडे जा रहे हो', लग्नाच्या ८ वर्षानंतर रितेशला वाटतंय 'असं' काही...