मुंबई - 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खानने दोनच चित्रपटातून चाहत्यांची पसंती मिळवली आहे. अल्पावधीतच ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. सोशल मीडियावरही ती काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. तिच्या गोड हास्याने आणि निरागसतेने ती चाहत्यांची नेहमीच मने जिंकते. तिच्या या गुणांमुळे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही तिचं कौतुक केलं आहे.
साराचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती स्वत:चे सामान स्वत:च घेऊन जात होती. अगदी सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिने विमानतळावरुन रस्ता काढत सामान घेऊन जाताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही तिचे कौतुक केले होते.