मुंबई -मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत चढउतार पाहायला मिळत आहे. अलिकडेच त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे देखील त्यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ऋषी कपूर यांनी स्वत: त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे.
ऋषी यांनी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'माझी तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे. मागच्या १८ दिवसांपासून मी दिल्ली येथे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. तिथल्या प्रदूषणामुळे मला संसर्ग झाला. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि प्रार्थनांमुळे मी बरा झालो आहे', असे त्यांनी ट्विटमध्ये लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा -अलार्म नाही, तर या गोष्टीमुळे जान्हवीला उठवता येणं सोप्पं, पाहा व्हिडिओ