महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवोदित दिग्दर्शकांना ऋषी कपूर यांनी दिला 'हा' सल्ला - Rishi Kapoor upcoming film

ऋषी यांनी अभिनेते शम्मी कपूर यांचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 'तिसरी मंजील' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

Rishi Kapoor Adviced Young Directors, Rishi Kapoor share old photo, Rishi Kapoor news, Rishi Kapoor upcoming film, Rishi Kapoor share picture of Shammi Kapoor
नवोदित दिग्दर्शकांना ऋषी कपूर यांनी दिला 'हा' सल्ला

By

Published : Feb 23, 2020, 5:42 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही जुने फोटो शेअर करुन आठवणींना उजाळा देत असतात. यावेळी मात्र, त्यांनी एक जुना फोटो पोस्ट करुन आजच्या पिढीतील दिग्दर्शकांना एक सल्ला दिला आहे.

ऋषी कपूर यांनी अभिनेते शम्मी कपूर यांचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 'तिसरी मंजील' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक विजय आनंद हे कॅमेराजवळ बसून शम्मी यांच्या अभिनयाचे निरिक्षण करताना या फोटोमध्ये दिसतात.

हा फोटो शेअर करुन ऋषी यांनी लिहिले आहे, की 'आजचे दिग्दर्शक हे संगणकाच्या स्क्रिनसमोर बसून कलाकारांच्या अभिनयाचे निरिक्षण करतात. मात्र, कॅमेरासमोर बसून तुम्ही कलाकारांच्या अभिनयाला पारखले पाहिजे. आज लोक नव्या उपकरणांसोबत आनंदी आहेत'.

हेही वाचा -मुलगी श्वेतासाठी बिग बींनी शेअर केली भावनिक पोस्ट

ऋषी कपूर यांच्या या ट्विटला दिग्दर्शक शेखर कपूर, चित्रपट निर्माते कुणाल कोहली यांनीही समर्थन दिले आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, ऋषी कपूर हे मागच्या वर्षी इमरान हाश्मीसोबत 'द बॉडी' या चित्रपटात दिसले होते. आता त्यांनी काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

हेही वाचा -विक्रम गोखलेंसाठी 'बिग बी' लावणार का हजेरी? पाहा, 'एबी आणि सीडी'चा टीझर

ABOUT THE AUTHOR

...view details