कोलकाता - प्रसिद्ध बंगाली व्यंगचित्रकार, लेखक आणि चित्रकार नारायण देबनाथ यांचे मंगळवारी सकाळी कोलकाता येथे निधन झाले. त्यांना तीन दिवस वेंटिलेशन सपोर्टमध्ये ठेवण्यात आले होते. नारायण देबनाथ (वय ९७) यांना गेल्या २५ दिवसांपासून कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
देबनाथ यांच्या प्रसिद्ध निर्मितीमध्ये हंडा भोडा, नॉनटे फोंटे आणि बतुल द ग्रेट यांचा समावेश आहे. नारायण देबनाथ यांनी फ्रीलान्सिंग कॉमिक्स कलाकार म्हणून सुरुवात केली. डी. लिट मिळालेले ते भारतातील पहिले आणि एकमेव कॉमिक्स-कलाकार आहेत. देबनाथ यांना २०२१ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले आहे.