महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री, गायिका एंजल रायचे 'तू आके देख ले' रिलीज

एंजल रायच्या मधुर आवाजात रेकॉर्ड केलेले 'तू आके देख ले' हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एंजलचे हे गाणे स्ट्रिंग म्युझिक चॅनलने प्रसिद्ध केले आहे. या गाण्याला इन्स्टाग्रामवर दहा लाख आणि डिजीटल अ‌ॅपवर १ कोटी व्ह्यू्व्ज मिळाले आहेत.

singer Angel Rai
अभिनेत्री, गायिका एंजल

By

Published : Nov 12, 2020, 3:50 PM IST

पाटना- अभिनेत्री, गायिका एंजल रायच्या मधुर आवाजात रेकॉर्ड केलेले 'तू आके देख ले' हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एंजलचे हे गाणे स्ट्रिंग म्युझिक चॅनलने प्रसिद्ध केले आहे. गाण्याचे दिग्दर्शन रीता राय यांनी केले आहे. हे गाणे प्रेक्षकांना आवडल्यानंतर एंजल म्हणाली,"हे गाणं खूपच सुंदर आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे."

हेही वाचा -ट्विटरवर शांत राहण्याचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने दिले प्रत्युत्तर

एंजल ही एक मॉडेल देखील आहे, जी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. या गाण्याला इन्स्टाग्रामवर दहा लाख आणि डिजीटल अ‌ॅपवर १ कोटी व्ह्यू्व्ज मिळाले आहेत.

हेही वाचा - मिलिंदचा नवा फोटो पाहून चाहत्यांना आली अक्षय कुमारची आठवण

यापूर्वी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका झुबिन गर्ग यांच्यासह एंजेलने 'एक नजर', 'रांझरा', 'आने वाले पल'साठी गायन केले आहे. 'किना सोना' हे आणखी एक गाणे लवकरच रिलीज होणार असल्याचे एंजेलचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे एंजेलचा पहिला संगीत व्हिडिओ 'जब चाये मेरा जादू' सारेगामाने प्रदर्शित केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details