मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई फोर्ट कोर्टाने क्रूज ड्रग्स प्रकरणात दाखल केलेली जामीन याचिका शुक्रवारी फेटाळली. आर्यन खानला आता आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. अशा परिस्थितीत आता आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत.
विशेष म्हणजे ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानकडून कोणताही ड्रग जप्त करण्यात आलेला नाही. असे असूनही आर्यन खानला जामीन मिळाला नाही. आर्यन खानला जामीन का मिळाला नाही आणि एनसीबीने कोर्टात त्याच्या उत्तरात काय नमूद केले ते आपण जाणून घेऊयात...
वकील सतीश मानेशिंदे सेशन कोर्टात मागणार दाद
आपल्याला माहिती असेल, की सुशांत सिंह राजपूतच्या गूढ मृत्यूमध्ये अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे प्रकरणही सतीश मानशिंदे यांनी लढवले होते. आता आर्यन खानचे प्रकरणही सतीश मानशिंदे यांच्या हातात आहे. आर्यन खानची जामीन याचिका फेटाळल्यानंतर सतीश आता मुंबईच्या सत्र न्यायालयात जाणार आहेत. तोपर्यंत आर्यन खानला आर्थर जेलमध्ये राहावे लागेल.
एनसीबीने कोर्टात कोणता जवाब दाखल केला?
आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांना कोर्टात हाच प्रश्न पडला होता की जेव्हा आर्यन खान कडून कोणताही ड्रग जप्त केला गेला नाही. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचादेखील शोध घेतला गेला, या प्रकरणात त्याची सतत चौकशी केली गेली, मग जामीन देण्यास विलंब का होत आहे? यावर एनसीबीने म्हटले की, जोपर्यंत या प्रकरणाची पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्यात सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला जामीन देणे चुकीचे आहे.
आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर पुरावे आणि साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो, असेही एनसीबीचे मत होते. तिसरे म्हणजे, एनसीबीने न्यायालयात सांगितले की जामीनावरील निर्णय एनडीपीसी कायद्याअंतर्गत सत्र न्यायालयात घेतला जाऊ शकतो, दंडाधिकारी न्यायालयात नाही. एनसीबीचे उत्तर दाखल केल्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खानसह सातही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले, त्यानंतर सतीश मानशिंदे आता जामिनासाठी सत्र न्यायालयात जाणार आहेत.