महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रविना टंडन बनणार आजी, मुलीसाठी ग्रँड पार्टिचं आयोजन - रविना टंडन

छाया ही रविनाची दत्तक मुलगी आहे. १९९५ साली रविनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. पूजा तेव्हा ११ वर्षाची होती. तर, छाया ही ८ वर्षाची होती.

रविना टंडन बनणार आजी, मुलीसाठी ग्रँड पार्टिचं आयोजन

By

Published : Sep 8, 2019, 1:11 PM IST

मुंबई -अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी बनणार आहे. तिची मुलगी छाया हिच्यासाठी तिने बेबी शॉवरचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

छाया ही रविनाची दत्तक मुलगी आहे. १९९५ साली रविनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. पूजा तेव्हा ११ वर्षाची होती. तर, छाया ही ८ वर्षाची होती.

रविना टंडन बनणार आजी, मुलीसाठी ग्रँड पार्टिचं आयोजन

रविनाने नेहमी आईचं कर्तव्य बजावत तिच्या दोन्हीही मुलींना शिकवलं. पुढे त्यांची लग्न केली. आता छाया आई बनणार आहे. त्यामुळे या खास क्षणाचं सेलिब्रेशन करण्यासाठी रविनाने बेबी शॉवर आयोजित केलं होतं.

रविना टंडन बनणार आजी, मुलीसाठी ग्रँड पार्टिचं आयोजन

यावेळी रविनाचे काही खास मित्र मैत्रीणी आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

रविना टंडन बनणार आजी, मुलीसाठी ग्रँड पार्टिचं आयोजन

वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, रविना २०१७ साली 'शब'मध्ये झळकली होती. त्यानंतर अलिकडेच ती सोनाक्षी सिन्हासोबत 'खानदानी शफाखाना' चित्रपटातही छोट्या भूमिकेत पाहायला मिळाली. आता तिच्या नावाची 'केजीएफ चॅप्टर २'साठीदेखील चर्चा होताना पाहायला मिळतेय. तर, छोट्या पडद्यावरील 'नच बलिये'च्या परिक्षकाचीही ती भूमिका साकारत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details