मुंबई -दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'केजीएफ' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानंतर त्याच्या सिक्वेलचीही तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात बॉलिवूडची सुपरहिट जोडी रविना टंडन आणि संजय दत्त हे एकत्र भूमिका साकारणार आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, रविना टंडन या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, संजय दत्त हा डॉनची भूमिका साकारणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या चित्रपटासाठी रविना टंडनचे नाव निश्चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.