मुंबई -दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा आगामी 'केजीएफ चॅप्टर २' हा चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे. 'केजीएफ'च्या तुफान यशानंतर आता 'केजीएफ चॅप्टर २' कडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात आता ९० चं दशक गाजवणारी अभिनेत्री रविना टंडनचीही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. यश व्यतीरिक्त अभिनेता संजय दत्त आणि श्रीनीधी शेट्टी यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे.