महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अण्णांशी लग्न करून शेवंता नाईक वाड्यात प्रवेश करणार ! - रात्रीस खेळ चाले २’

‘रात्रीस खेळ चाले २’  ही मालिका पुन्हा एकदा एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलेली आहे. शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे.जर तसं झालं तर नक्की नाईकांच्या वाड्यात त्याची काय प्रतिक्रिया उमटणार ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.

Ratis Khel Chale
रात्रीस खेळ चाले २

By

Published : Jul 22, 2020, 12:54 PM IST

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच मालिकांचं शूटिंग बंद असल्याने काही काळ या मालिकेचं शूटिंग देखील बंद होतं. मात्र आता पुन्हा एकदा या मालिकेचे नवीन भाग प्रक्षेपित व्हायला लागल्यानंतर ही मालिका पुन्हा एकदा एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलेली आहे.

शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. इकडे माईने घरात हळदी कुंकवाचा घाट घातलाय, इतक्यात हातात हिरवाचुडा,

कपाळावर मोठ्ठ कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहते. सगळ्यांना धक्का बसतो, शेवंताने तिचा पण पूर्ण केला आणि अण्णांशी लग्न केलं.पण तिला नाईकवाड्यात प्रवेश मिळेल की, यामागे सुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शेवंता अण्णांची लग्नासाठी मंदिरात वाट पाहतेय मात्र ते काही येत नसल्याचा प्रोमो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अशात आता अण्णा आणि शेवंता यांचं लग्न होणार का..? आणि तसं झालं तर नक्की नाईकांच्या वाड्यात त्याची काय प्रतिक्रिया उमटणार ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.

ABOUT THE AUTHOR

...view details