मुंबई : "सुखी संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं" असे म्हणत सुरू झालेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्य करत आहे. टीआरपीचे नवे उच्चांक गाठलेल्या या मालिकेचे चित्रीकरण लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवस बंद होते. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. एवढेच नाही, तर यामध्ये एक नवीन ट्विस्टदेखील असणार आहे.
स्वावलंबी, कर्तृत्ववान आणि सर्वांची आवडती 'राधिका', तिच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'शनाया' आणि यामध्ये अडकलेला 'गुरूनाथ' या तिघांची अफलातून केमिस्ट्री हे या मालिकेच्या यशाचे गमक आहे. लॉकडाऊननंतर आता परवानगी मिळाल्यामुळे, सर्व नियम व अटींचे पालन करुन या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होणार आहे.
जुनी शनाया येणार परत..