महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बादशाह दिसणार ईव्हेंट मॅनेजर, पंडीत, शेफ, रॅपर आणि फॅशन डिझाईनर अशा पाच अवतारांमध्ये!!

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी से येस टू द ड्रेसची भारतीय आवृत्ती डिस्कव्हरी+ भारतात आणली आहे. सध्या सुरु झालेल्या वेडिंग सिझनमध्ये या ब्रँडने भारतातील सर्वांत प्रसिद्ध रॅपर आणि युवा सेन्सेशन बादशाहला त्यातील म्युझिक व्हिडिओसाठी पसंती दिली आहे. त्याच्यासोबत आहे आघाडीची महिला गायिका पायल देव.

रॅपर बादशाहाचे पाच अवतार
रॅपर बादशाहाचे पाच अवताररॅपर बादशाहाचे पाच अवतार

By

Published : Dec 6, 2021, 10:28 PM IST

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी से येस टू द ड्रेसची भारतीय आवृत्ती डिस्कव्हरी+ भारतात आणली आहे. सध्या सुरु झालेल्या वेडिंग सिझनमध्ये या ब्रँडने भारतातील सर्वांत प्रसिद्ध रॅपर आणि युवा सेन्सेशन बादशाहला त्यातील म्युझिक व्हिडिओसाठी पसंती दिली आहे. त्याच्यासोबत आहे आघाडीची महिला गायिका पायल देव. या श्रवणीय गाण्याला आदित्य देवने संगीत दिले असून याची निर्मिती द कंटेंट टीम या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे आणि त्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे डान्सर व प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित जे पाठकने.

या म्युझिक व्हिडीओची खासियत म्हणजे पहिल्यांदाच बादशाहला पाच अवतारांमध्ये दिसणार आहे. तो इव्हेंट मॅनेजर, पंडीत, शेफ, रॅपर आणि फॅशन डिझायनर बनून तो अतिशय ऊर्जेने परफॉर्म करताना दिसेल. या व्हिडिओमध्ये रिअल टाईम नववधूंचे दर्शन तर घडेल तसेच त्यात मनोरंजन, सेलिब्रेशन आणि प्रत्येक वधूकडे तिला हवे असलेले लूक्स देण्याची थीमसुद्धा असेल.

डिस्कव्हरी+ साठीच्या त्याच्या से येस टू द ड्रेस इंडिया या नवीन ट्रॅकबद्दल बोलताना बादशहा म्हणाला, “हे गीत प्रत्येक वधूसाठी योग्य नोटसला हिट करते व वधूच्या मनात येणा-या अनेक विचारांना कॅपचर करण्याचा मी प्रयत्न करत असताना त्याचे प्लेआउट आखणे अतिशय मजेशीर होते. पहिल्यांदाच मी केवळ माझ्या भूमिकेत नव्हतो तर काही वेगळ्या अवातारांमध्येही होतो व त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठीसुद्धा अतिशय वेगळा ठरला.” त्याने पुढे असे म्हटले, “या वर्षी दुस-यांदा डिस्कव्हरी+ सोबत सहभागी होणे अतिशय आनंदाची बाब आहे आणि भविष्यातही त्यांच्यासोबत अशा मनोरंजक प्रकल्पांवर काम करण्याची मला इच्छा आहे.” बादशहासोब्त काम करणे नेहमीच आनंददायक असते. आम्ही स्वत: ह्या ट्रॅकचा इतका आनंद घेतो, त्यावरून मी खात्रीने म्हणू शकते की हे गाणे जितके डिजर्व्ह करते, तितके प्रेम त्याला नक्कीच श्रोत्यांकडून मिळेल असे मत गायिका पायल देवने व्यक्त केले.

“मी या गाण्याची कोरिओग्राफी शक्य तितकी सोपी व कॅची ठेवली जेणेकरून भारतीय विवाहामध्ये किंवा पार्टीच्या प्रसंगी प्रत्येक जण ते सहजपणे रिक्रिएट करू शकेल. तसेच, बादशाहने हे इतके थक्क करणारे आश्चर्यकारक गीत बनवले आहे की, त्याला बघतानाही न्याय देण्यासाठी मला त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईझ एलिमेंट म्हणून त्यालाही त्यामध्ये आधी कधीही न बघितलेल्या पंडीत, विवाहाचा आयोजक, शेफ व डिझाईनर अशा रूपामध्ये दाखवावेसे वाटले व ते त्यानेही‌ उत्तम प्रकारे पार पाडले,” असे कोरिओग्राफर पुनीत जे पाठक म्हणाला.

कंटेंट टीमचे संस्थापक व मुख्य निर्माते नीरज शर्मा ह्यांनी सांगितले की, “टीसीटीमध्ये आमचा विश्वास आहे की, क्रिएटीव्ह सोल्युशन्सद्वारे श्रोत्यांना कंटेंटच्या जवळ आणणे गरजेचे आहे. भारतातील काही प्रतिष्ठित गाण्याच्या रिअलिटी शोजला अलीकडच्या काळात मिळालेल्या सफलतेमुळे आम्हाला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये श्रोत्यांना काय हवे आहे, याची नीट कल्पना आली. वर्षाचा सर्वांत मोठा शादी ब्लॉकबस्टर आपल्यासाठी घेऊन येताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.”

८ डिसेंबर २०२१ रोजी प्रिमियर होत असलेल्या से येस टू द ड्रेस इंडियामध्ये वेगवेगळ्या जीवन क्षेत्रांमधील वधूंचे दर्शन घडेल व देशातील आघाडीचे फॅशन डिझायनर्स त्यांना त्यांच्या स्वप्नातील वस्त्रांच्या निवडीसाठी व तयारीसाठी मदत करतील.

हेही वाचा - ‘मराठी बाहुबली’ मधील बेला शेंडेच्या आवाजात स्वरबद्ध झालेली गाणी भावताहेत प्रेक्षकांना!

ABOUT THE AUTHOR

...view details