मुंबई - दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग भारताबाहेर गेले आहेत. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे जोडपे कुठे गेलंय याचा अंदाज लावणे कठीण आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केलेत, ते बुचकाळ्यात टाकणारे आणि सस्पेन्स वाढवणारे आहेत..
दीपिकाने दोन सायकलचा एक फोटो शेअर केलाय. या सायकलीवरुन त्यांनी भटकंती केली असावी, असा अंदाज चाहते लावत आहेत. दुसरा फोटोत दोन छत्र्या दिसत आहेत. यावरुन ते युरोपात गेल्याचा अंदाज काही जणांनी लावलाय.
विशेष म्हणजे तिसऱ्या फोटोत दोन चप्पल दिसत आहेत. वाळूतला हा फोटो असल्यामुळे ते सुंदर सुमद्र किनाऱ्यावर सुट्टी घालवत असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते भारतात नाहीत. कारण काही दिवसापूर्वी त्यांनी पासपोर्टचा फोटो शेअर केला होता. यावरुन ते भारताबाहेर सुट्टी घालवत असल्याचे दिसते. ते नेमके कुठे आहेत याचा खुलासा तेच करतील अशी अपेक्षा चाहते नक्कीच बाळगू शकतात.
कामाच्या पातळीवर दीपिकाचा अलिकडेच 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. रणवीर सिंग आगामी '८३' या चित्रपटात काम करीत आहे.
या जोडीने गेल्यावर्षी १४ नोव्हेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते. दोघांनी पारंपरिक दाक्षिणात्य पध्दतीने विवाह केल्यानंतर उत्तर भारतीय विधीनुसारही विवाह केला होता. संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांसह अनेक चित्रपटातून एकत्र भूमिका केल्या आहेत.