महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाळा महाविद्यालयात विद्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे - राणी मुखर्जी - Nashik District latest news

नाशिक पोलीस आयोजित 'महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा' या परिसंवाद कार्यक्रमात राणीने हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.

Rani Mukerji on self defence education to students at Nashik
शाळा महाविद्यालयात विद्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे - राणी मुखर्जी

By

Published : Dec 16, 2019, 4:30 PM IST

नाशिक - देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वराक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे, असे मत अभिनेत्री राणी मुखर्जीने व्यक्त केले आहे. नाशिक पोलीस दलाकडून आयोजित 'महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा' या परिसंवाद कार्यक्रमात राणीने हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.

राणीचा 'मर्दानी २' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांवरील अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीची मुख्य भूमिका आहे. 'महिलांवर अत्याचाराला नाही म्हणा' या परिसंवादात राणी मुखर्जीसह, अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रवीण तरडे, जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीही उपस्थिती होती.

राणी मुखर्जी

यावेळी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना राणी मुखर्जीने दिलखुलास उत्तरे दिली.
एक महिला, आई म्हणून पार्वती बनू शकते. मात्र, त्याच आईने अत्याचारा विरुद्ध कालिका मातेचं रूप धरणं केलं पहिजे. निर्भया सारख्या घटनेने देश हादरला. मी एक महिला असून मी देखील ४ वर्षाच्या मुलाची आई आहे. प्रत्येक महिलांनी अन्यायाविरुद्ध आपल्या अंतर्गत शक्ती जागृत करायला हवी. प्रत्येक मुलीने अन्यायाविरुद्ध लढण्याचा विचार करायला हवा. प्रत्येक महिलेने सक्षम होणे गरजेचे आहे. प्रसंगी अत्याचाराविरोधात दोन हात करण्याची तयारी देखील असली पाहिजे, असे मत तिने यावेळी व्यक्त केले.

''मर्दानी २' या चित्रपटातील शिवानी शिवाजी रॉय ही माझी भूमिका आज पर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतली महत्त्वाची भूमिका असल्याचं मला वाटते. शिवाजी महाराजांचं नाव माझ्या नावात वापरल्याने मला अन्यायाविरुद्ध चित्रपटात काम करतांना देखील एक प्रकारची ऊर्जा मिळाली, असंही ती म्हणाली.
'प्रत्येक पुरुषाने पत्नीला कामात प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, यासोबतच बाहेर काम करतांना महिलांनी देखील आपल्या परिवाराला वेळ देणं तितकचं महत्त्वाचे आहे. दिवस रात्र देशाची सेवा करणाऱ्या महिला पोलिसांचा मला अभिमान वाटतो. मी त्यांना मनापासून सलाम करते. तसेच सरकारने विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालया पासूनच स्वरक्षणाचे धडे देणं सक्तीचे करावे', असं मतही तिने मांडलं.

या कार्यक्रमाला शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्य करणाऱ्या महिला, निर्भया पोलीस पथकातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details