महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिकसोबतचा फोटो शेअर करताच... 'त्या' वक्तव्यावरून रंगोलीच झाली ट्रोल - Hritik Roshan news

रंगोली आणि हृतिकचा हा फार जुना फोटो आहे.

Rangoli Takes A dig at Hritik Roshan, share throwback photo
हृतिकसोबतचा फोटो शेअर करुन कंगनाने म्हटले असे काही की नेटकऱ्यांनी केले ट्रोल

By

Published : Mar 19, 2020, 7:24 PM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये कंगना रनौत आणि हृतिक रोशनचा वाद सर्वांनाच परिचीत आहे. अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. मात्र, कंगनाची बहीण रंगोलीने हृतिकसोबतचा एक फोटो शेअर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच तिने हृतिकबाबत असे काही लिहले आहे, की नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केले आहे.

रंगोली आणि हृतिकचा हा फार जुना फोटो आहे. रंगोलीने हा फोटो शेअर करुन लिहिलेय, की 'कंगनासमोर चांगले बनण्यासाठी हृतिक मला इंप्रेस करत असतो.' तिचे हे कॅप्शन पाहून हृतिकच्या चाहत्यांनी रंगोलीवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा -'मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी'; 'या' अभिनेत्रीचा फोटो शेअर करुन धर्मेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

काही जणांनी या ट्विटला रिप्लाय देत लिहले आहे, की 'हा वाद आता येथेच थांबवण्यात यावा. तर, कोणी लिहिले आहे की, 'यामुळे हृतिकची नाही, तर कंगनाचीच प्रतिमा मलिन होईल'.

कंगना आणि हृतिकचा हा वाद २०१६ साली सुरू झाला होता. एका मुलाखतीमध्ये कंगनाने हृतिकला 'मुर्ख एक्स' असे म्हटले होते. दोघांनी एकमेकांना कायदेशीर आव्हान दिले होते.

हेही वाचा -अमिताभ यांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टँप; त्यांनी का शेअर केला फोटो?

ABOUT THE AUTHOR

...view details