महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कबीर सिंह'पेक्षा 'गली बॉय'मधील आलिया भट्ट जास्त 'हिंसक', रंगोलीचे पुन्हा वादग्रस्त ट्विट

कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेल हिने एका पाठोपाठ एक असे चार ट्विट करीत 'कबीर सिंह' चित्रपटाचे समर्थन केले आहे. या चित्रपटातील कबीर सिंगची व्यक्तीरेखा 'गली बॉय'मधील आलिया भट्टने साकारलेल्या सफिनाहून कमी हिंसक असल्याचे म्हटले आहे.

रंगोलीचे पुन्हा वादग्रस्त ट्विट

By

Published : Jul 8, 2019, 10:35 AM IST


मुंबई - कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेल पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत आली आहे. यावेळी तिने शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या 'कबीर सिंग'ची बाजू उचललीय. 'कबीर सिंह' चित्रपट आलिया भट्टच्या 'गली बॉय'मधील भूमिकेपेक्षा कमी हिंसक असल्याचे म्हटले आहे.

रंगोलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, "हे जे अडाणी, गावंढळ, बेकार स्त्रीवादी लोक 'कबीर सिंह'वर तुटून पडलेत यांना 'गली बॉय'च्या सफीनामध्ये ( आलिया भट्ट) कोणतीच वाईट गोष्ट दिसत नाही. ती हिंसक, छळणारी आणि गुन्हेगारीवृत्तीची कबीरहून जास्त आहे.

"प्रत्येकवेळी तिचा बॉयफ्रेंड दुसऱ्या महिलेसोबत शय्यासोबत करीत असतो पण ती त्याला काहीच बोलत नाही. तो राजा मुलगा आहे, पण ती महिलेच्या डोक्यात बाटली फोडते, तिला रुग्णालयात दाखल करावे लागते आणि सफिनावर गुन्हेगारीची केस दाखल होते.

"जर तुमचा पुरुष तुम्हाला फसवत असेल, तुम्हाला न विचारता मारहाण करीत असेल तर हे स्त्रीवादी यावर उभे राहून टाळ्या वाजवतात...विचार करा.!!

"जो फसवणारा व्यक्ती असतो तो झुरळासारखा असतो. आलिया असल्या व्यक्तीच्या मागे का वेडी झालीय. तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. हा स्त्रीवाद आहे का ? कृपया समजवा मला." असे ट्विट करुन रंगोलीने स्त्रीवादी लोकांना आपले टारगेट बनवले आहे.

शहीद कपूरचा 'कबीर सिंह' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल करीत आहे. मात्र काहीजण त्यावर टीका करीत आहेत. 'कबीर सिंह'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना याबद्दल विचारले असता त्यांनी दावा केला की, नकारात्मक गोष्टींचा मुद्दा बनवणारे लोक स्त्रीवादी असत नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details