महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तौक्ते वादळाचा फटका रणबीर आलियाच्या घराला

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुंबईतील वांद्रे येथे बनत असलेल्या घराच्या बांधकामाला तौक्ते चक्रीवादळामुळे तडाखा बसला आहे. झाड कोसळले असून बरेच नुकसान झाल्याचे व्हाडिओतून दिसत आहे.

Ranbir, Alia's
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

By

Published : May 18, 2021, 10:39 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुंबईतील वांद्रे येथे बनत असलेले घर तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड विस्कळीत झाले आहे.

रणबीर आणि आलिया यांनी काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलाय. यात त्यांच्या निर्माणाधिन घराच्या प्रवेशद्वारासमोर झाड पडल्याचे दिसत असून वादळामुळे बरेच नुकसान झाले आहे.

स्वप्नातील अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे ऑनलाइन समोर आली आहेत. अभिनेत्रीच्या कुटूंबाच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने चक्रीवादळ तौक्तेने झालेल्या नुकसानीची झलक व्हायरल व्हिडिओ आणि चित्रांमध्ये दिली आहे.

यापूर्वी रणबीर आणि आलिया यांनी रणबीरची आई नीतू कपूर यांच्यासोबत अनेकदा बांधकाम ठिकाणी भेट दिली होती.

हेही वाचा - फक्त १५ मिनिटांत उरकले सोनाली कुलकर्णीचे लग्न!

ABOUT THE AUTHOR

...view details