महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राणा दग्गुबातीचे आभासी कुटुंब बळकट, इन्स्टाग्रामवर झाले ४० लाख फॉलोअर्स - राणा दग्गुबातीचे आभासी कुटुंब बळकट,

बाहुबली अभिनेता राणा दग्गुबातीचे आभासी कुटुंब बळकट होत आहे. कारण बुधवारी तेलुगु स्टारने चार लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स मिळवले आहेत. अभिनेत्याने फोटो आणि व्हिडिओ शेअर प्लॅटफॉर्मवर धाव घेतली आणि वेबसाइटवरील फॉलोअर्सची संख्या हायलाइट करुन, त्याच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला.

Rana Daggubati
राणा दग्गुबाती

By

Published : Jul 8, 2020, 7:46 PM IST

हैदराबाद: तेलगू स्टार राणा दग्गुबातीचे आता इंस्टाग्रामवर चार लाख फॉलोअर्स झाले आहेत.

राणाने आपल्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्या वेबसाईटवरील 4M खाली हायलाइट केले आहे.

“आता हा फोर्स 4 दशलक्ष आहे ... या अफाट शक्तीबद्दल धन्यवाद.” त्याने स्नॅपशॉटवर लिहिले.

यावर्षी राणाच्या आयुष्यात बरेच काही घडले आहे. मे महिन्यात राणाने मिहीका बजाजबरोबर आपले सूत जुळल्याचे स्पष्ट केले होते.

सिनेमात तो यापुढे हाथी मेरे साथीत दिसणार आहे. या तीन भाषेतील चित्रपटाचे चित्रीकरण केरळच्या जंगलात तसेच भारतातील महाबळेश्वर, मुंबई आणि थायलंडमध्ये केले गेले आहे.

तिन्ही भाषेतील चित्रपटांचा राणा हा नायक आहे. पुलकित सम्राट हिंदी भाषेत राणाची समांतर मुख्य भूमिका साकारत आहे, तर दक्षिणेचा अभिनेता विष्णू विशाल या चित्रपटाच्या तमिळ आणि तेलगू आवृत्तीत झळकेल.

श्रीया पिळगावकर आणि झोया हुसेन या तिन्ही चित्रपटांच्या आवृत्तींमध्ये आघाडीच्या नायिका असतील.

हेही वाचा - 'बॉलिवूडमधील प्रस्थापितांनी इतरांना 'आऊटसायडर' म्हणून हिणवणे बंद केले पाहिजे'

आसामच्या काझीरंगा येथील हत्ती कॉरीडोरवर मानवांनी अतिक्रमण केल्याच्या दुर्दैवी घटनेने हा चित्रपट प्रेरित झाला आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या भूमिकेत राणा दिसणार आहे.

राणा यांनी तेलगू ब्लॉकबस्टर लीडरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दम मारो दम' या सिनेमातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

राणा दग्गुबातीने आजवर असंख्या दाक्षिणात्या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये कृष्णम वंदे जगद्गुरुम, बेबी, बाहुबली: द बिगनिंग, नाटकाल, बाहुबली 2: द कन्क्लूजन, रुद्रमादेवी, द गाझी अ‍ॅटॅक आणि नेने राजू नेने मंत्री अशा चित्रपटांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details