मुंबई -'धडक' गर्ल जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या 'रूहअफ्जा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. जान्हवीने शूटिंग सुरू झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. मात्र, तिने शेअर केलेल्या फोटोमधून या चित्रपटाच्या नावात थोडा बदल केला असल्याचे दिसून येत आहे.
होय, सुरुवातीला 'रूहअफ्जा' असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या नावात आता किंचीत बदल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे नाव 'रुही अफ्जा' असे करण्यात आले आहे.
'रूही अफ्जा'चे क्लॅप बोर्डवर चित्रपटाच्या नावात बदल झालेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून जान्हवीने यावर 'करने आ रहे है आपके अटेंशन का कब्जा, आज से शुरू होती है रुही अफ्जा', असे खास कॅप्शनही दिले आहे.