मुंबई - 'किंग खान' शाहरुख आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटाची आजही प्रचंड क्रेझ तरुणाईत पाहायला मिळते. या चित्रपटातील गाण्यांपासून ते शाहरुखची आयकॉनिक स्टाईल सर्वांचीच आजही प्रेक्षकांवर भूरळ आहे. विशेषत: या चित्रपटातील 'जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी', बडे बडे शहरो मे एसी छोटी छोटी बाते होती रेहती है', हे संवादही फार गाजले होते. याच चित्रपटातील क्लॉयमॅक्स सिन राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी रिक्रियेट केला आहे. याचा मजेदार व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राजकुमार राव - पत्रलेखावर 'डीडीएलजे'चा फिवर, पाहा मजेदार व्हिडिओ - climax scene
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील 'राज' आणि 'सिमरन' हे पात्र आजही तरूण वर्गात लोकप्रिय आहेत. या चित्रपटाची एवढी क्रेझ आहे, की राजकुमार आणि पत्रलेखाने देखील या चित्रपटाचा क्लॉयमॅक्स सिन शूट केला आहे. राजकुमारने एक व्हिडिओ शेअर करुन 'लंडनमधील काही मजेदार क्षण' असे कॅप्शन दिले आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील 'राज' आणि 'सिमरन' हे पात्र आजही तरूण वर्गात लोकप्रिय आहेत. याच चित्रपटापासून काजोल आणि शाहरुखची जोडी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या चित्रपटाची एवढी क्रेझ आहे, की राजकुमार आणि पत्रलेखाने देखील या चित्रपटाचा क्लॉयमॅक्स सिन शूट केला आहे. राजकुमारने एक व्हिडिओ शेअर करुन 'लंडनमधील काही मजेदार क्षण' असे कॅप्शन दिले आहे.
या व्हिडिओमध्ये पत्रलेखा सिमरनच्या भूमिकेत दिसत आहे. तर, राजकुमार राव 'राज'च्या भूमिकेत पाहायला मिळतोय. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत.