चेन्नई -भगवान मुरुगनचा अपमान करणे आणि धार्मिक द्वेष पसरवून दैवतांची बदनामी करणे किमान आता तरी थांबले पाहिजे, असे मत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे. असे कृत्य करणाऱ्या यूट्यूब वाहिनीवर कारवाई केल्याबद्दल रजनीकांत यांनी तामिळनाडू सरकारचे कौतुक केले आहे.
परमेश्वराच्या स्तुतीसाठी गायिलेले तामिळ भजन "कंदा साष्टी कवचम" यांच्या विटंबनेमुळे कोट्यवधी तमिळ लोकांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ते म्हणाले, "कंदा साष्टी कवचम याची अत्यंत वाईट रीतीने निंदा करणाऱ्या आणि कोट्यवधी तामिळ लोकांच्या भावना दुखावणाऱ्यांवर त्वरित कारवाई केल्याबद्दल तामिळनाडू सरकारचे मनापासून कौतुक करतो. तसेच हा व्हिडिओ संबंधित यूट्यूब वाहिनीने काढून टाकल्याची बातमीही त्यांनी दिली.