महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राहुल वैद्याच्या वाढदिवसानिमित्य पत्नी दिशा परमारने केला प्रेमशुभेच्छांचा वर्षाव - राहुल वैद्या आणि दिशा परमार यांचा विवाह

गायक राहुल वैद्य आपला 34 वा वाढदिवस मालदीवमध्ये पत्नी आणि अभिनेत्री दिशा परमारसोबत साजरा करत आहेत. राहुलसाठी हा प्रसंग खास बनवत दिशाने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

राहुल वैद्य वाढदिवस
राहुल वैद्य वाढदिवस

By

Published : Sep 23, 2021, 4:24 PM IST

मुंबई - गायक राहुल वैद्य आपला 34 वा वाढदिवस मालदीवमध्ये पत्नी आणि अभिनेत्री दिशा परमारसोबत साजरा करत आहेत. राहुलसाठी हा प्रसंग खास बनवत दिशाने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. "माझ्या प्रेमळ आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू मला भेटलास त्यामुळे मी नशीबवान आहे!!'', असे तिने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशासोबत दिशाने परदेशातील सुट्टीचा आनंद घेत असतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात दोघेही मिठी मारताना दिसत आहेत.

राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर राहुलने दिशाला केले होते प्रपोज

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दिशा आणि राहुल या वर्षी 16 जुलै रोजी एका भव्य विवाह सोहळ्यात विवाहबंधनात अडकले. बिग बॉस 14 मध्ये सर्वात पहिल्यांदा राहुलने दिशाबद्दलची आपली भावना व्यक्त केली होती. त्याने राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर दिशाला प्रपोज केले होते. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

दरम्यान, दोघांच्या कामाचा विचार करता, दिशा सध्या 'बडे अच्छे लगते हैं 2' मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे आणि राहुलने 'खतरों के खिलाडी 11' मधील स्टंटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

हेही वाचा - साडी नेसलेल्या महिलेस रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्याने भडकली रिचा चढ्ढा

ABOUT THE AUTHOR

...view details