महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुपरस्टार सुर्याची नवी हिरॉईन असेल राशी खन्ना - raashi khanna upcoming films

दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याची नवी हिरॉईन राशी खन्ना असणार आहे. राशीनेच या बातमीला दुजोरा दिलाय. लॉकडाऊननंतर सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होईल.

Raashi Khanna to star opposite Suriya in Aruvaa
सुपरस्टार सुर्याची नवी हिरॉईन असेल राशी खन्ना

By

Published : May 4, 2020, 12:26 PM IST

चेन्नई - तामिळ सुपरस्टार असलेल्या सुर्याची हिरॉईन निश्चित झाली आहे. अरुवा या आगामी चर्चित चित्रपटाचा दिग्दर्शक हरी याची निर्मिती करणार असून राशी खन्ना याच्यासोबत सुर्याची जोडी असेल.

राशी खन्ना हिने स्वतःच या बातमीला दुजोरा दिलाय. सोशल मीडियावरील एका प्रश्नोत्तरात तिने ही गोष्ट सांगितली.

या चित्रपटाबद्दलचा संवाद सुरू असून लॉकडाऊननंतर या चित्रपटाची निर्मितीला सुरुवात होईल असे राशीने सांगितले आहे.

अरुवा तामिळमधील बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. सुर्या आणि हरी यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले अहेत. सिंघम, सिंघम २ आणि सिंघम ३ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्याबरोबरच आरु आणि वेल या हिट चित्रपटाची निर्मितीही दोघांनी केली आहे. हरीसोबत सुर्याचा हा सहावा चित्रपट असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details