बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमुळे बिग बॉस यांनी विशाल, विकास, जय आणि उत्कर्षला कार्यामधून बाद केले आणि उर्वरित सदस्यांसोबत कार्य पुढे सुरू राहील अशी घोषणा केली. तृप्ती देसाई यांनी विकासला सांगितले मीनल एकदम चिटिंग करते. मीनलचे म्हणणे आहे की तीच एक नंबरची खोटारडी आहे तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता. असा थर्ड क्लास गेम मी कधी आयुष्यात खेळणार नाही.
बिग बॉस मराठीच्या घरातील नाती प्रत्येक टास्कनंतर, टास्क दरम्यान बदलताना दिसत आहेत. उत्कर्ष, जय यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते की त्यांना काही झाले तरी मीराला कॅप्टन होऊ द्यायचे नाहीये. आणि त्यासाठी ते दुसर्या कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहेत. याची कल्पना मीराला देखील आहे. मीनल आणि उत्कर्षमध्ये याचवरुन चर्चा झाली ज्यामध्ये मीनलने त्याला सांगितले की तिला कॅप्टन होण्याची इच्छा आहे.