मुंबई -'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी तो प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णीसोबत 'ती अॅन्ड ती' या चित्रपटात झळकला होता. आता यावर्षी तो अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत 'वेल डन बेबी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
प्रियांका तंवर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा त्यांचा पहिलाच मराठी दिग्दर्शनीय चित्रपट आहे. तर, आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग हे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.