महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पुष्पक विमान'च्या फिल्ममेकरसोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट - धागा प्रेम का

पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले 'भज गणपती' हे पहिले गाणे ठरले होते. आता या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याचं दिग्दर्शन ‘पुष्पक विमान’ या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी केले आहे.

धागा प्रेम का

By

Published : Aug 2, 2019, 7:58 PM IST

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन ‘पुष्पक विमान’ या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी केले आहे.

या गाण्याविषयी अभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे यानृत्यशैलीत पहिला आणि याच नृत्यशैलीत दूसराही व्हिडिओ आला आहे. युगानुयुगांपासून पारंपारिक शास्त्रीय कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवल्या गेल्या आहेत. आत्ताच्या पिढीपर्यंत भरतनाट्यम हा नृत्यप्रकार पोहचावा यासाठी युट्युब हे उत्तम माध्यम आहे. एखाद्या कलेची सिरीज करत असताना त्यात विविध प्रकारच्या भावभावनांचा अंतर्भाव केला पाहिजे. म्हणून ‘अंतर्नाद’ डान्स सिरीजमधल्या दूस-या गाण्यामध्ये एक प्रेमकथा दाखवली गेली आहे. “

‘धागा प्रेम का’ या गाण्यात रहीम दास यांचे दोन लोकप्रिय दोहे आहेत. ‘प्रेमाचा धागा तोडू नये, तुटला तर गाठ पडते’. अशा आशयाचे हे गाणे आहे. गाण्यात नृत्यांगना आणि मृदुंग वादक या जोडीची प्रेमकथा भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितली आहे. गाण्याला पुर्वी भावेची आई आणि शास्त्रीय सुप्रसिध्द गायिका वर्षा भावे यांनी संगीत दिले आहे.

या गाण्याच्या शुटींगचा अनुभव सांगताना पुर्वी भावे म्हणते, “या गाण्यात जितकी माणसं स्क्रीन वर दिसत आहेत त्यापैकी कुणालाच शुटिंगचा अनुभव नव्हता. मात्र कसलेला दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्याने सर्वांकडून उत्तम परफॉर्मन्स करवून घेतला आहे. या आधीच्या ‘भज गणपती’ डान्स मध्ये मी एकटीच दिसले होते. परंतु यागाण्यात माझी डान्स अकॅडमी ‘हाउस ऑफ नृत्य’ च्या विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. “

ABOUT THE AUTHOR

...view details