मुंबई - ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली'मध्ये 'भल्लालदेव'ची भूमिका साकारणारा अभिनेता लवकरच 'हाथी मेरे साथी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच राणाने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. यामध्ये राणाची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. राणासोबत या चित्रपटात बॉलिवूडच्या एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे. त्याचाही फर्स्ट लुक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
अभिनेता पुलकित सम्राट या चित्रपटात राणासोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट काझिरंगा राष्ट्रीय उद्यानमधील हत्तींवर आधारित आहे. जंगली प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
हेही वाचा -२०० कोटींच्या कर्ज प्रकरणात बॉलिवूड निर्माता - दिग्दर्शकाला अटक