एकता कपूरची निर्मिती असलेली मालिका ‘बडे अच्छे लगते हैं’ प्रचंड गाजली होती ज्यात अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेचा दुसरा सिझन येतोय. अनेकांच्या नजरा ‘बडे अच्छे लगते हैं’ च्या दुसऱ्या सिझनची वाट बघताहेत. या मालिकेतील राम आणि प्रिया ही लोकप्रिय जोडी या सत्रात साकारणार आहेत, नकुल मेहता आणि दिशा परमार. तिशीत असलेल्या या जोडप्यातील अबोध आणि गुंतागुंतीचे नाते उलगडून दाखवणार्या या मालिकेत शहरी एकाकीपण आणि इतर बरेच काही सादर होणार आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे ‘बडे अच्छे लगते हैं २’, ज्याचे हृदयस्पर्शी प्रोमो रिलीज झाले आणि ते प्रेक्षकांना खूपच भावले. नकुल मेहता आणि दिशा परमार यांच्यातील संयत केमिस्ट्री दर्शवणारे, सर्वांना इतके आवडलेले, प्रोमोज दिग्दर्शित केले आहेत ‘बधाई हो’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका बजावलेले गजराज राव या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याने.
इन्स्टाग्रामवर नकुलने त्यांच्यासाठी एक छोटीशी गोड नोट देखील लिहिली. तो लिहितो, “हा असा उद्योग आहे, जिथे तुम्ही एकामागून एक कामे करत राहता, वेळेची बंधने पाळता, येथील कामाच्या स्वरूपामुळे प्रत्येक टप्प्यावर जुळणारी नाती एका सामान्य दिनचर्येचा भाग असतात. @गजराजराव मात्र त्याला अपवाद आहेत. सुमारे एक दशकापूर्वी आम्ही दोघांनी एका चॉकलेटच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते त्यानंतर आता माझ्या नव्या टीव्ही मालिकेच्या लॉन्च-अभियानासाठी काही प्रोमोजमध्ये मला त्यांचे दिग्दर्शन लाभले.”
गंमत म्हणजे नकुल मेहताने या आधी एका चॉकलेटच्या जाहिरातीत गजराज राव यांच्यासोबत काम केलेले आहे. या निमित्ताने नकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर गजराज राव सोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे व त्यात त्याने गजराज राव यांना ‘gorgeous anomaly म्हणून संबोधले आहे.