मसूरी - बालाजी टेलिफिल्म्सची क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि टीव्ही सिरियल निर्माती एकता कपूर आजकाल मसूरीच्या पर्वत रांगांमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. एकता कपूरने मसूरीतील लाल टिब्बा, मॉल रोड, पिक्चर पॅलेस आणि इतर ठिकाणांना भेट दिली. त्याचबरोबर पर्वत रांगांमधील हवामान आणि नैसर्गिक सौंदर्य एकताला खूप आकर्षक वाटत आहे.
बालाजी टेलिफिल्म्सच्या क्रिएटिव्ह हेड आणि जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि भारतीय चित्रपट-टीव्ही सीरियलच्या निर्मात्या एकता कपूर 14 ऑगस्टपासून मसूरीमध्ये पर्यटनासाठी आली आहे. ती गेल्या दोन दिवसांपासून मसूरी येथील हॉटेल सवॉय येथे मुक्कामास आहे. एकता कपूर तिच्या मसूरी दौऱ्यात विविध क्षेत्रांना भेट देत आहे. त्याचप्रमाणे, तिने मसूरीचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. एकताच्या चाहत्यांना फोटो खूप आवडले आहेत. एका युजरने लिहिले - 'तुमचे स्मित लाखात एक आहे', तर दुसऱ्याने लिहिलंय - 'सुंदर'