महाराष्ट्र

maharashtra

प्रियंका आणि निक जोनासने आसाम पूरग्रस्तांसाठी दिली देणगी

By

Published : Jul 27, 2020, 2:11 PM IST

प्रियंका चोप्रा जोनास आणि निक जोनास यांनी आसाम राज्यातील पूरग्रस्तांच्या मदत निधीसाठी देणगी दिली आहे. त्यांनी ही माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे.

Priyanka Chopra, Nick Jonas
प्रियंका आणि निक जोनास

मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि गायक पती निक जोनास यांनी आसाम पूरग्रस्तांच्या मदत निधीसाठी दान केले आहे. तसेच या पूरग्रस्ताच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी इतरांनाही केले आहे.

आसाममध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत १०० लोक मृत्यूमुखी पडले असून १२९ प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. गायक अभिनेता निक जोनास याने मदत कार्यांत सहभागी असलेल्या काही संस्थांची नावे शेअर केली आहेत. या संस्थांकडे लोक आपली मदत पाठवू शकतात.

"आम्ही सर्व अजूनही जागतिक साथीच्या परिणामाचा सामना करीत असतानाच, भारतात आसाम राज्य दुसरे मोठे संकट झेलत आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात कोट्यवधी लोकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे.", असे प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

"जीवन, जमीन आणि संपत्तीवर होणारा परिणाम हा अकल्पनीय आहे. जलद वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे काझीरंगा नॅशनल पार्कमध्येदेखील पूर आला आहे, हे जगातील एक उत्तम वन्यजीव अभयारण्य आहे.," असे तिने लिहिलंय.

हेही वाचा -सुशांतसिंह डिप्रेशनमुळे अनेकदा झाला होता अॅडमिट, रुमी जाफरे यांचा खुलासा

निक आणि प्रियंकाने आसाममध्ये पूरग्रस्तांची मदत करणाऱ्या दोन संस्थांचे संदर्भ दिले असून मदतीचे आवाहन केले आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) च्या म्हणण्यानुसार रविवारी पावसामुळे झालेल्या पूरात ९६ लोकांचा बळी गेला आहे. एकूण २,5५४३ गावे ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाण्याच्या परिणामामुळे त्रस्त आहेत. याचा १.२२ लाख हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आसाम सरकारच्या म्हणण्यानुसार बोकाघाटमधील काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व येथील १२९ प्राण्यांचा परामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 496 मदत शिबिरांमध्ये 50,136 लोक राहत आहेत, असे एसडीएमएने सांगितले. यावर्षी चौथ्यांदा आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये पूरांचा कहर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details