महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"उमेश माझा जुनाच गडी, पण..." पाहा लग्नाच्या दहा वर्षांनंतर प्रिया बापटचा खास उखाणा! - प्रिया बापट

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दाम्पत्य असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापटच्या विवाहाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"उमेश माझा जुनाच गडी, पण..." पाहा लग्नाच्या दहा वर्षांनंतर प्रिया बापटचा खास उखाणा?
"उमेश माझा जुनाच गडी, पण..." पाहा लग्नाच्या दहा वर्षांनंतर प्रिया बापटचा खास उखाणा?

By

Published : Oct 6, 2021, 3:34 PM IST

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दाम्पत्य असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापटच्या विवाहाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस

विवाह सोहळ्यादरम्यान उखाणा घेत असल्याचा एक व्हिडिओ प्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात उमेश आणि प्रिया हे दोघेही पाहुण्यांच्या आग्रहावरून खास उखाणा घेतात. यावर प्रियाने "माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय, आमच्या विवाहातील सर्वोत्तम क्षण" असे कॅप्शन लिहिले आहे.

उमेशने घेतलेला उखाणा

"कांती तिची सुरेख, रुप तिचे अलवार, प्रिया माझी रत्नजडीत तलवार" हा उखाणा उमेशने यावेळी घेतल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.

प्रियाने घेतलेला उखाणा

"सारेगमपच्या सुरांना ल्यायला नवा साज, उमेश माझा जुनाच गडी, पण नवं माझं राज" असा उखाणा प्रियाने घेतल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.

हेही वाचा -उमेश कामत म्हणतो, ‘प्रत्येक कपलने एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे’!

ABOUT THE AUTHOR

...view details