मुंबई - निर्माता नागेश कुकनूर यांचा राजकीय नाट्य असलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजचा दुसरा सिझन 30 जुलै रोजी डीस्ने हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यात अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
मुख्यमंत्री वडिलांच्या खुर्चीवर आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न या भागात प्रिया बापट करताना दिसणार आहे.
प्रिया बापटची दमदार भूमिका
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ च्या पहिल्या भागात प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी पहिल्यांदाच वेब सिरीजमध्ये एकत्र झळकले होते. यातील प्रियाच्या भूमिकेची भरपूर चर्चा झाली होती. तिने पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारली होती. तर अतुल कुलकर्णीने अमेय राव गायकवाड ही व्यक्तीरेखा दमदार पध्दतीने साकारली होती. आता दोघांचाही पुन्हा कसदार अभिनय या सिझनमध्येही पाहायला मिळणार आहे.
समर्थ दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांची मालिका
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही नागेश कुकनूर यांची पहिलीच वेब सिरीज आहे.नागेश कुकुनूर नायडू हे हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि अभिनेता म्हणूनही परिचीत आहेत. यापूर्वी त्यांनी हैदराबाद ब्लूज, रॉकफोर्ड, इकबाल, डोर, आशायिन, लक्ष्मी आणि धनक यासारखे समांतर सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘इकबाल’, आणि ‘डोर’ हे बॉलिवूड चित्रपट खूप गाजले होते.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा