महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Saregampa Little Champs : संजय जाधव आणि कौशल इनामदार येताहेत ‘लिटिल चॅम्प्स’ सोबत कल्ला करण्यासाठी! - 'सारेगमप लिट्ल चॅम्प्स‘

महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील लहानग्या गायकांसाठी 'सारेगमप लिट्ल चॅम्प्स‘ (Saregampa Little Champs)चा मंच पर्वणी ठरला आहे. झी मराठी वरील लोकप्रिय 'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या छोट्या स्पर्धकांचे फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील फॅन झाले आहेत. या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आलाय. हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम (Favorite event for music lovers)आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांना निमंत्रित केले जाते आणि ते प्रेक्षकांनाही आवडत असते. येत्या आठवड्यात या मंचावर २ अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व सज्ज होणार आहेत.

By

Published : Nov 19, 2021, 4:27 PM IST

सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव (Director Sanjay Jadhav)आणि संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार (Music director Kaushal Inamdar)या मंचावर लिटिल चॅम्प्सच कौतुक करण्यासाठी उपस्थित असणार आहे. या दोघांच्या उपस्थितीत लिटिल चॅम्प्सने एका पेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. गेल्याच आठवड्यात कॉलबॅक राउंड मध्ये रागिणी शिंदे हिची स्पर्धेत पुन्हा एन्ट्री झाली. तसेच गौरी गोसावी, ओंकार कानेटकर, पलाक्षी दीक्षित यांनी १० पेक्षा जास्त गोल्डन तिकिट्स मिळवून फिनाले मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे या आठवडयात कुठला लिटिल चॅम्प गोल्डन तिकीट मिळवेल आणि कुठला लिटिल चॅम्पचा स्पर्धेतील प्रवास थांबेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हे कार्यक्रम प्रसारित गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.

हेही वाचा - PM Modi Address To Nation : तीनही कृषीकायदे रद्द होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details