मुंबई -नुकतेच ‘सिंगल’ या चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे येथे गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी करण्यात आले. या सोहळ्याला अभिनय बेर्डे, प्रथमेश परब, दिग्दर्शक चेतन चवडा, निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम तसेच संतोष शर्मा, शीतल ढेकळे, रितेश ठक्कर, सुहास गायकवाड यांनी उपस्थिती होती. एकत्र कधीही काम न केलेली तरुण कलाकारांची जोडगोळी, प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे, दमदार आणि उत्कंटावर्धक चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे.
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर प्रथमेशच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले तर अभिनयच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. 'सिंगल' मध्ये प्रथमेश आणि अभिनय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. परंतु इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असून चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे. आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व याची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे या तरुण जोडगोळीचा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास लवकरच सज्ज होत आहे. दिग्दर्शक चेतन चवडा दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम निर्मित असून धमाल विनोदी चित्रपट ‘सिंगल’ सादर करण्यास सज्ज झाले आहेत.
Single Marathi Movie : 'सिंगल' चित्रपटातून प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे हास्याचा ‘डबल’ धमाका - प्रथमेश परब
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 'सिंगल' मध्ये प्रथमेश आणि अभिनय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.
'सिंगल' चित्रपट