मुंबई -अभिनेता जितेंद्र जोशीचा 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'दोन स्पेशल' कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विविध कलाकार या कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील विविध किस्से उलगडत असतात. पाहुण्यांची विविध विषयावरील मते, त्यांच्या आयुष्यातील काही किस्से, आठवणी, अविस्मरणीय क्षण या कार्यक्रमातून प्रेक्षकांना बघायला मिळतात. यावेळी अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर हे या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर यांच्याही आयुष्यातील बऱ्याच गोष्टी येणाऱ्या भागात प्रेक्षकांना ऐकता येणार आहेत. प्रशांत दामले मंचावर आले आणि गाणे होणार नाही, असे तर अशक्यच. गप्पांची सुरुवात 'मला सांगा सुख म्हणजे' या गाण्याने होणार आहे. याचसोबत प्रेक्षकांना अनेक सुंदर गाणीदेखील ऐकायला मिळणार आहेत.
हेही वाचा -'ह.म. बने तु.म. बने' मालिकेतून पहिल्यांदाच झळकणार तृतीयपंथी कलावंत