मुंबई - कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं होतं. यानंतर राज यांची ईडीच्या कार्यालयात ९ तास कसून चौकशी करण्यात आली. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत असताना अभिनेता प्रसाद ओकच्या एका पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
प्रसादचा ठाकरे लूक; म्हणतोय, 'Thinking about EDiots' - प्राजक्ता माळी
प्रसादनं इन्स्टाग्रामवरुन आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो हुबेहुब राज ठाकरे यांच्याप्रमाणे दिसत आहे. त्यानं दिलेली पोजही राज यांचीच आठवण करुन देणारी आहे. फोटोत प्रसादनं हनुवटीवर हात ठेवला असून तो काहीतरी विचार करत आहे.

प्रसादनं इन्स्टाग्रामवरुन आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो हुबेहुब राज ठाकरे यांच्याप्रमाणे दिसत आहे. त्यानं दिलेली पोजही राज यांचीच आठवण करुन देणारी आहे. फोटोत प्रसादनं हनुवटीवर हात ठेवला असून तो काहीतरी विचार करत आहे. या फोटोपेक्षाही मजेशीर आहे, ते याचं कॅप्शन. (थिंकिंग अबाऊट इडियट्स) Thinking about EDiots, असं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं असून हा अप्रत्यक्षरित्या या सर्व प्रकरणावर मारलेला टोला आहे.
प्रसादची ही पोस्ट यूजर्सच्या चांगलीच पसंतीस आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकारांनीही ही पोस्ट लाईक केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रसादच्या या पोस्टवर कमेंट करत 'अतिशय मार्मिक' असं लिहिलं आहे.