महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, बाप्पाला घातलं साकडं - मराठवाडा

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. तिने अभिषेक करून गणपतीकडे साकडं घातलं.

प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

By

Published : Sep 4, 2019, 9:02 PM IST

पुणे- गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलाकार मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

हेही वाचा - गणपती विसर्जन : ढोल ताशांच्या गजरात सलमानसह या कलाकारांनी धरला ठेका

यावेळी तिने अभिषेक करून गणपतीकडे साकडं घातलं. एकीकडे सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावं लागतं आहे. बाप्पाकडे इतकंच मागणं आहे, की ही पाण्याची विषमरेष समरेषेत रूपांतरित व्हावी आणि पाण्याचे जे प्रश्न आहेत ते दूर व्हावे, अशी प्रार्थना केल्याचे प्राजक्ता म्हणाली.

प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

हेही वाचा - मुंबईत मुसळधार पाऊस, पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट ढकललं पुढे

ABOUT THE AUTHOR

...view details