मुंबई- मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी मिळाली आहे. झाडे तोडण्याच्या विषयावर नेमलेल्या समितीने 8 विरुद्ध 6 मतांनी प्रस्ताव मंजूर करून मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. यानंतर मुंबईतील नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - प्रविण तरडे आणि राकेश बापट यांनी साकारला इको फ्रेंडली श्रीगणेश
अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणत आहे, की ही झाडे तोडण्याच्या बदल्यात नवी झाडे लावणारं असल्याचं आश्वासन दिलं गेलं असलं, तरीही प्रत्यक्षात मात्र, असी कोणतीच प्रक्रिया होताना दिसत नाही. यामुळे आम्ही याला विरोध दर्शवत निदर्शनं करत असून तुम्हीही या झाडांच्या संरक्षणासाठी यात सहभागी व्हा, असं आवाहन ती इतरांना करत आहे.
‘मेट्रो ३ फक्त निमित्त, पुढे तिथे बाजारीकरण होऊन सिमेंटची जंगलं उभारणार.. ही खरी भीती आहे,’ असं प्राजक्ताने तिच्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या निर्णयाला शिवसेनेकडूनही विरोध कायम आहे.
हेही वाचा - एमी जॅक्सनचं बेबी शॉवर