मुंबई - इंडियन यूट्यूबर प्राजक्ता कोळी हिची खयाली पुलाव ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे. तिच्या या फिल्मचे इंटरनेटवर भरपूर कौतुक होत आहे. या लघुचित्रपटात तिने 17 वर्षांची शालेय मुलगी आशा ही नायिका साकारली आहे. सरकारी शाळेत शिकणारी ही मुलगी खेळावर जास्त लक्ष देत असते. पारंपरिक रुढींना मागे टाकत हँडबॉल खेळणारी ही छोट्या गावातील मुलगी आणि तिचा संघर्ष या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आलाय.
"वय वाढत गेलं आणि नंतर माझ्या दैनंदिन बोलण्यातून लक्षात आलं, की जेव्हा आपण सर्वसाधारणपणे मुली आणि स्त्रियांबद्दल विचार करतो तेव्हा आपण एक समाज म्हणून किती पूर्वग्रहदूषित असतो. समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी या शॉर्ट फिल्मच्या माध्यामतून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे, असे प्राजक्त कोळीने सांगितले.
हेही वाचा - भेदभाव करणाऱ्या सौंदर्याच्या कल्पनेला मान्यता देऊ शकत नाही : अदिती राव हैदरी
"तिची स्वप्न माहित असलेल्या या बालिकेचे वागणे आश्चर्यकारक आहे, परंतु तिचे सर्वसाधारण विचारधारा सुधारण्यासाठीच्या तिच्या प्रगतशील विचारसरणीने तिला लवचिक आणि दृढनिश्चयी बनविले आहे. लहान शहरातील मुलींची स्वप्ने पूर्ण होत असताना त्यांच्या जगण्याचे स्वातंत्र किती महत्त्वाचे आहे. शॉर्ट्स घालण्याची साधी कृतीदेखील एक गुंतागुंतीची गोष्ट बनून जाते. एका खेळाडू असणे म्हणजे ती स्वतंत्र स्त्री म्हणून जगण्याचे निमित्त आहे. तिची मते इतरांच्या मतानुसार नसतात आणि तोकडे कपडे घालण्याऐवजी तिने शरीर झाकावे अशी अपेक्षा केली जाते," असे ती पुढे म्हणाली.
चित्रपटात काम करणारे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना वाटते, की हा चित्रपट म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाची अतिशय मूलभूत पातळीवरील एक गोड गोष्ट आहे. खयाली पुलाव ही शॉर्टफिल्म तरुण दुडेजा यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलंय. अभिनेता यशपाल शर्मा एक क्रीडा शिक्षक म्हणून मुख्य भूमिकेत आहे.
ही कथा हरियाणातील एका छोट्या गावात घडते. पुरुष सत्ताक नियम आणि रुढींमध्ये पिचलेल्या स्त्रीयांच्या स्वातंत्र्यावर इथे बोलणेही होत नाही. स्त्रीयांनी स्वतः ला व्यक्त करण्याचे, कपड्यांच्या निवडीचे इथे अधिकार नसतात. हा संघर्ष या मुलीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडलेला दिसतो.