भोपाळ- भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आश्रम 3 या वेब सिरीजच्या शूटिंगबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आश्रम वेब सिरीजचे शूटिंग मध्य प्रदेशात कुठेही होणार नाही, असा इशारा प्रज्ञा सिंह यांनी दिला आहे. यासंदर्भात त्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार आहेत.
साधू संतांची कमिटी पाहणार स्क्रिप्ट - प्रज्ञा ठाकूर
सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी दिला आहे. यापुढे अशा शूटिंगपूर्वी त्याची स्क्रिप्ट साधू संतांची कमिटी साधू संतांची कमिटी पहिल्यांदा वाचेल आणि योग्य असेल तर परवानगी दिली जाईल असेही प्रज्ञा ठाकूर यांनी महटलंय.