पणजी - सनबर्नचा लोकप्रिय संगीत महोत्सव यावर्षी मर्यादित क्षमता आणि कोविड -१९ सुरक्षेच्या उपायांसह पुन्हा गोव्यात होत आहे. आयोजकांच्यावतीने सनबर्नच्या देशातील १४व्या महोत्सवाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तीन दिवसांचा महोत्सव वाघातोरमध्ये २७ डिसेंबरपासून होणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी सर्व पर्यटक आणि पाहुण्यांना थर्मल स्कॅनिंग करावे लागेल आणि आरोग्य सेतू अॅप आपल्या मोबाइलवर ठेवावा लागेल.
कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे मर्यादित संख्येने लोक आणि त्यांच्यात पुरेसे अंतर राखण्यासाठी, वाघातोर येथील समारंभाचे आयोजक संपूर्ण ठिकाणी योग्य व्यवस्था राखतील. कार्यक्रमास येणार्या प्रत्येक व्यक्तीला मुख्य मंचासमोर एक ठरवलेले स्थान असेल. नवीन एंट्री आणि एक्झिट प्रोटोकॉल कार्यक्रमस्थळी सेट केले जातील.
सनबर्न फेस्टिव्हलमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना संपूर्ण फेस्टदरम्यान फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. फेस्ट आयोजित केलेल्या मैदानावर अतिथींसाठी नियमित थर्मल स्कॅनिंग, हात धुणे आणि सॅनिटायझर देखील उपलब्ध असतील. मैफल देखील लाइव्ह स्ट्रीम केली जाईल.
सनबर्नचे निर्माता परसेप्ट लाइव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) करण सिंह म्हणाले की, "कोविड -१९ ने खरोखरच आयुष्याला विराम लावला आहे. भारतात आम्ही मार्चपासून कडक बंदोबस्ताचे उपाय पाहिले आहेत. अनलॉक प्रक्रियेची सुरुवात आणि विशेषतः अनलॉक-५ मध्ये ग्राऊंडिंग इव्हेन्ट्सना अनलॉक करण्यासोबतच आम्हाला असे वाटले की, आयुष्य पूर्ववत सुरू करण्याची वेळ आली आहे. आता 'लीव्ह अगेन' (पुन्हा आयुष्य जगण्याची) वेळ आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुन्हा 'जगणे, प्रेम करणे आणि नृत्य' करण्याची वेळ आली आहे. जागतिक स्तरावर लागू असलेल्या उत्तम मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून सनबर्न गोवा २०२० मर्यादित क्षमतेसह सर्वोत्कृष्ट इव्हेन्ट होईल. "