महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Pondicherry : संपूर्णतः स्मार्ट फोनवर शूट झालेला पहिला मराठी चित्रपट, ‘पाँडीचेरी'! - नीना कुळकर्णी

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दूरवर पसरलेले अथांग समुद्रकिनारे, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरे आणि तेथील निसर्गसौंदर्य. कोणाही पर्यटकाला सहज भुरळ पडेल, असे हे रम्य ठिकाणी हा चित्रपट शूट झाला आहे.

‘पाँडीचेरी'
‘पाँडीचेरी'

By

Published : Feb 14, 2022, 9:35 AM IST

मुंबई - हल्लीचे स्मार्टफोन्ससुद्धा प्रगत तंत्रज्ञान वापरतात आणि त्यामुळे सामान्य नागरिकही फोटोग्राफर बनला आहे. बऱ्याच शॉर्ट्स फिल्म्स स्मार्टफोन्सवर चित्रित झाल्याचे आपण ऐकत असतो. परंतु आता एक असा मराठी सिनेमा येतोय जो पूर्णतः स्मार्ट फोनवर शूट झाला आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पाँडीचेरी’ यात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर असे कलाकार आहेत. तसेच या चित्रपटात महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दूरवर पसरलेले अथांग समुद्रकिनारे, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरे आणि तेथील निसर्गसौंदर्य. कोणाही पर्यटकाला सहज भुरळ पडेल, असे हे रम्य ठिकाणी हा चित्रपट शूट झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

पॉंडिचेरीचे घडणार दर्शन
पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्णपणे स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे.

एक वेगळा प्रयोग

'पाँडीचेरी'बद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, '’एक वेगळा प्रयोग ‘पाँडीचेरी’मध्ये करण्यात आला आहे. जी स्मार्ट फोनवर चित्रीत झाली असून चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अशा पध्दतीची ही पहिली फिचर फिल्म आहे. अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ‘पाँडीचेरी’ आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. असाच एक वेगळा विषय, कथा आपल्याला 'पाँडीचेरी' मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक जमेच्या बाजू आहेत. दिग्दर्शक, कथा, कलाकार आणि नैसर्गिक सौंदर्याने खुललेले नयनरम्य 'पाँडीचेरी'.''


हेही वाचा -‘काम नसेल तेव्हा मला घरी राहायला आवडते तसेच घरची कामे करायला पण आवडते’ - दीपिका पदुकोण

ABOUT THE AUTHOR

...view details