आषाढीच्या वारीनिमित्त यंदा वारी निघणार नाहीये तर ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका थेट पंढरपूरला जाणार आहेत. असं असलं तरीही वारकऱ्यांच्या मनातील भक्तीभाव मात्र तसुभर देखील कमी झालेला नाही. त्यांच्याच मनातील भावनेला वाट मोकळी करून देण्याचं काम केलं आहे ते अभिनेता कवी संकर्षण कऱ्हाडे याने.
आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'
आषाढी वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरला चालत जाणार नाहीत. त्यामुळे अनेकांच्या वाट्याला निराशा आलेली असली तरी भक्तीभाव कमी झालेला नाही. कविमनाचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने त्याच्या मनातील भाव या निमित्ताने कवितेतून मोकळे केले आहेत.
संकर्षण कऱ्हाडे
आषाढी वारीच्या निमित्ताने संकर्षणने पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का...? असं म्हणत त्याच्यापुढे आपल्या मनातील भाव व्यक्त केले आहेत. नक्की त्याला काय म्हणायचं आहे ते जरा त्याच्याच शब्दात ऐकुयात..